in

Uddhav Thackeray | लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढलं… राज्यभरात ‘कोरोनामुक्त गाव’ मोहीम राबवणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यातील लॉकडाऊन ३१ मे रोजी संपत असल्याने त्यानंतर ब्रेक द चेन मोहिमेचे पुढील स्वरुप कशाप्रकारचे असेल याबद्दल मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले. या जनता संवादमध्ये मुख्यमंत्र्यांनी कोरोना परिस्थिती, ऑक्सिजन पुरवठा, म्युकर मायकोसिस, कोरोनामुक्त गाव मोहीम, कोरोनामुळे पालक गमावलेली मुलं, दहावी आणि बारावीच्या परीक्षा, कोरोना काळातील सरकारची मदत आणि तौक्ते वादळावर भाष्य केलं.

मुख्यमंत्र्यांच्या जनता संवादातील महत्वाचे मुद्दे :

ब्रेक द चेन

१५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवणार

अत्यावश्यक सेवांना दुपारी २ पर्यंत परवानगी

काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध आणखी कडक होणार

कोरोना कमी झालेल्या जिल्ह्यांमधील कोरोना नियमांमध्ये शिथिलता

तौक्ते चक्रीवादळ

एनडीआरफ च्या निकषांपेक्षा जास्त मदत
मागील निसर्ग वादळाच्या निकषांनुसार कोकणग्रस्तांना मदत
किनारपट्टीवर कायमस्वरुपी उपाययोजनांची आवश्यकता

कोरोना काळातील सरकारी मदत

२ लाख ७४ हजार मेट्रिक टन मोफत अन्न
निवृत्ती वेतन ८५० कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा
५५ लाख शिवभोजन थाळ्या पुरवल्या
फेरीवाले – ५२ कोटींचा निधी दिला
३३०० कोटींचा निधी मंजूर केला होता…मात्र प्रत्यक्षात तीन हजार ८६५ कोटी मंजूर केला

शिक्षण

दहावीच्या परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी सरकारची

१२ वीच्या परीक्षा घेण्यासंदर्भात केंद्र सरकारने मार्गदर्शन करावे

सर्व राज्यांना १२ वीच्या परिक्षांसंदर्भात एकच निर्णय केंद्राने लागू करावा

पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी राज्य सरकार घेणार…लवकरच नवी योजना जाहीर होणार

कोरोनामुक्त गाव मोहीम

राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक

लवकरच कोरोनामुक्त गाव मोहीम हाती घेणार

नगर, दक्षिण सोलापूर, मोहोळ या ठिकाणच्या आदर्श गावांचा उल्लेख

गाव पातळीवर कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शासनाने यंदाचा पालखी सोहळा बायो- बबल पध्दतीने करण्यास परवानगी द्यावी

जून महिन्यात कोविशिल्डचे १० कोटी डोस… सिरमचं केंद्राला पत्र