in ,

उजनी धरणाची शंभराकडे वाटचाल

पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण शंभरीकडे वाटचाल करत आहे,धरणात केवळ चार टक्के पाणीसाठा वाढल्यास हे धरण १०० टक्के भरणार आहे, सध्या ९६ टक्के भरले असून गेल्या दोन दिवसांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने ३ दिवसांत ६ टक्के पाणी साठा वाढला आहे.

पुणे जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने धरणात येणारा विसर्ग खूपच मंदावला असुन धरणाच्या पाणीसाठ्याची वाढ ही धिम्या गतीने सुरू आहे तसेच उजनी धरणातील पाणी साठ्याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील ऊस, तरकारी आणि फळ उत्पादक, शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

रविवारी सकाळी उजनीतील पाणी साठा ९६.०४ टक्के आहे, तर आवक दौंड येथे ४ हजार ६२३ क्यूसेक्स आहे. बंडगार्डन (पुणे) येथे केवळ २ हजार ९१६ क्यूसेक्स आवक असून उपयुक्त पाणी साठा ५१.४५ टीएमसी इतका झाला आहे.

या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांत धरणावर मुसळधार पाऊस झाल्यान धरणात ६ टक्केची भर पडली आहे. तर गेल्या १५ दिवसात १३ टक्के पाणी साठा वाढला आहे. पुणे जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग अगदीच कमी आहे.मात्र सोलापूर जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू झाला असून धरणात पाणी साठा वाढण्याची शक्यता आहे.

रविवारी सकाळी धरणाने ९६ टक्के ची पातळी ओलांडून ९६.०४ टक्के ची मजल मारली आहे. हा महत्वाचा टप्पा गाठला असून तीन दिवसांत १०० टक्के होण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसाचा जोर प. महाराष्ट्रात कमी आहे.त्यामुळे उजनीकडे लागलेले शेतकऱ्यांचे डोळे अजूनही धरण पूर्ण क्षमतेने कधी भरणार याची वाट बघत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आजही वाढले पेट्रोल- डिझेलचे दर, जाणून घ्या…

“भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचे योगदान काय?” जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया