in

इमारतीचा पाचव्या मजल्याचा स्लॅब कोसळला

एकाचा मृत्यू, तर दोन जण जखमी

मयुरेश जाधव
धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणनारी घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक पाच भागात असलेल्या जय बाबानगर गेटजवळ पारस अपार्टमेंट आहे, या इमारतीचा शनिवारी रात्री पाचव्या मजल्याचा स्लॅब थेट चौथ्या मजल्यावर पडला. या घटनेत आकाश पोपटांनी नामक व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे ही इमारत धोकादायक असून इमारत खाली करण्याचे आदेश महानगरपालिकेने दिले होतो. मात्र तरी सुद्धा या इमारतीत चार कुटुंब राहत होते. या दुर्घटनेबद्दल माहिती मिळताच महापालिकेने या इमारतीला खाली करून रात्री सील केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विश्वचषक टी-२० : आज भारत-पाकिस्तान आमने-सामने

इगतपुरीत भीषण अपघात, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी