in

इंधन दरवाढीमुळे विद्यार्थी बैलगाडीवरून शाळेत

किरण नाईक
पेट्रोल 112 तर डिझेल 102 रुपयांवर येऊन ठेपल्याने या दरवाढीचा मोठा फटका बसत आहे. या वाढत्या इंधनांच्या किमतीच्या विरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नाशिकमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत बैलगाडी आंदोलन करण्यात आले.

दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झालेल्या दरवाढीच्या विरोधात आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बैलगाडी आंदोलन करण्यात आले आहे. तसेच बैलगाडीवर एका कार्यकर्त्याला फलंदाजाचा पोशाख घालत ‘डिझेल नॉट आउट 100’ असे लक्षवेधी चित्ररथ देखील यावेळी तयार करण्यात आले होते.

सातपूर परिसरात रॅली काढत मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली. ‘मोदी मतलब मेहंगाई’, ‘अबकी बार मेहंगाई पे वार’ अशा घोषणा या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून देऊन वाढत्या पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध या वेळी नोंदविण्यात आला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

धक्कादायक! जन्मठेपेची शिक्षा भोगणारा वृद्ध पॅरोलवर बाहेर, पुन्हा एकाचा धारदार शस्त्राने खून

राहुल गांधी ‘ड्रग अ‍ॅडिक्ट’ आणि ‘ड्रग पेडलर’; कर्नाटकातील भाजपा नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य