in

पुणेकरांना दिलासा, जाणून घ्या नवीन नियमावली

राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना पुण्यातील लॉकडाऊन शिथील होणार आहे. अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत सातत्याने घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे आता पुणे मनपाने शहरातील वीकेंड लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही ट्विट करत माहिती दिली. अत्यावश्यक सेवा शनिवार-रविवारही सुरु राहणार . पुणे मनपा हद्दीत शनिवार आणि रविवारीही अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु राहणार आहेत. या संदर्भातील मागणी आपण आढावा बैठक केली असता, त्यानुसार निर्णय घेतला आहे. किराणा, भाजी, दूध, बेकरी अशा आस्थापनांचा यात समावेश असेल.

पुण्यात रुग्णालयांकडून कोरोना उपचारांसाठी लावण्यात येणाऱ्या प्रत्येक बिलाचं ऑडिटरमार्फत ऑडिट केलं जाईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलं आहे. आत्तापर्यंत फक्त दीड लाख रुपयांच्या वरच्या बिलांचंच ऑडिट केलं जात होतं. पण, आता प्रत्येक बिलाचं ऑडिट केलं जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. तर पुणे मनपा क्षेत्रात कोविड 19 च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार असल्याचंही मनपाने स्पष्ट केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

यंदा वारी होणार की नाही?; अजित पवारांनी दिलं महत्त्वाची माहिती

Weather Forecast| राज्यात लवकरच होणार मान्सूनचे आगमन