in

महाराष्ट्रात सापडले यूपी-एमपीचे गावठी कट्टे

नाशिक राज्यात मोठ्या प्रमाणात गावठी शस्त्र सापडली आहेत. नाशिक परिक्षेत्रात हा उपद्रव जास्त असल्याने ही मोहीम तिथे सुरू करण्यात आली. अशा गुन्हांना रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी एक योजना आखली असून त्यानुसार राज्याचे पथक थेट परराज्यात जाऊन कारवाई करणार आहे.

बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांना पकडून चालणार नाही, त्या शस्त्रांचा उगम नेमका कुठे होतो याचा तपास करून कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच याचा तपास करताना नाशिक परिक्षेत्रातील पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून येथे पकडण्यात आलेल्या शस्त्रांचे उगमस्थान शोधून परराज्यात जाऊन कारवाई करण्यासाठी एक पथक स्थापन करण्यात आले आहे.

गुगल मॅप आणि स्थानिक पोलिसांची मदत घेत शेजारच्या राज्यांतील बेकायदा शस्त्र निर्मितीच्या कारखान्यांचा शोध सुरू करण्यात आले असून नाशिक परिक्षेत्रातील पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी ही माहिती दिली. या परिक्षेत्रात येणारे नाशिक, जळगाव, धुळे, नगर तसेच नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. पोलिसांनी सर्व नागरिकांना आवाहन करून बेकायदा शस्त्र ठेवणाऱ्यांची माहिती मागविली आहे.

महाराष्ट्रात हे शस्त्र उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश राज्यातून येतात. त्या ठिकाणी जाऊन कारवाई करणे महाराष्ट्र पोलिसांना शक्य होत नाही. जळगावच्या पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली एका खास पथकाची निर्मिती केली असून हे पथक तांत्रिक पद्धतीने परराज्यातील बेकायदेशीर कारखाने शोधून काढणार असल्याची माहिती मिळत आहे. या भागात गेल्या पाच वर्षांत बेकायदा शस्त्रांनी घडलेल्या गुन्ह्यांची माहिती एकत्रित करण्यात येणार आहे व नव्याने शस्त्र ठेवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सर्व माहिती करून उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशातून होणारा पुरवठा रोखण्यासाठी ही मोहीम आखली असल्याची माहिती पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वैनगंगेचा काठावर मौर्य कालीन वास्तुचे अवशेष; उत्खननाची होतेय मागणी

‘पांढऱ्या’ सोन्याची साठवणूक करा ; यंदा कापसाच्या दराच तेजी कायम राहणार