in

CoronaVirus : राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 35 हजारापेक्षा कमी

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात आज जवळपास अडीच हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे आता अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 35 हजाराहून कमी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.74 टक्क्यांवर पोहोचला आहे.

दिवसभरात 2 हजार 515 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 50 लाख 54 हजार 995 नमुन्यांपैकी 20 लाख 48 हजार 802 नमुने म्हणजेच 13.61 टक्के नमुने कोरोनाचे पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या 1 लाख 67 हजार 694 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर 34 हजार 640 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात आज 2,554 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 61 हजार 525 वर पोहोचला आहे. तर, आज 35 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे आतापर्यंत 51 हजार 360 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर 2.51 टक्के आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोना चीनच्या वुहान लॅबमधून पसरला? WHOचा दावा

धुळे : जयंत पाटलांच्या सभेत कार्यकर्त्यांचा ‘राडा’