in

इंडो पॅसिफिक परिक्षेत्रात भारत महत्वाचा भागीदार – अमेरिकेची स्तुतीसुमने

लोकशाही न्यूज नेटवर्क

इंडो पॅसिफिक परिक्षेत्रात भारत अत्यंत महत्वाचा भागीदार असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी डेमोक्रॅटिक सरकारमध्ये परराष्ट्र धोरणात भारताला महत्वाचं स्थान असल्याचे अधोरेखित केले.

जागतिक शक्ती म्हणून भारताचा उदय या क्षेत्राचे संरक्षण करण्याच्या दृष्टिने महत्वाचा असल्याचे अमेरिकेने म्हटलं आहे. यापूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस, जयशंकर यांच्याशी चर्चा केली होती. मागील १५ दिवसांमध्ये द्विपक्षीय चर्चा पार पडली. यावेळी संरक्षण, वातावरणीय बदल, व्यापार यांच्या वृद्धीसंदर्भात चर्चा झाली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांची फोनवरूनही चर्चा झाली. यामध्ये काही महत्वाच्या मुंद्यांवर संभाषण झाले. म्यानमारमध्ये सुरू असलेल्या सत्तातरावरून दोघांमध्ये चर्चा झाली. तसेच यावेळी ब्लिंकन यांनी चिंता व्यक्त करत त्याठिकाणी कायदा आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे मत व्यक्त केले.
दोन्ही देशांनी क्वॉड ग्रुप मार्फत सहकार्य वाढवण्यासाठी सहमती दर्शवली आहे. अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्रईस यांनी दिली. क्वॉड या ग्रुपमध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. इंडो- पॅसिफिक सीमाक्षेत्रात चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी या ग्रुपचे महत्व आहे.

भारत आणि अमेरिकेच्या रणनितिक सहकार्याची व्याप्ती विस्तृत आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत काम करत आहोत. भारत हा महत्वाचा व्यापारी भागिदार आहे. २०१९ मध्ये उभयतांत १४६ अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला आहे. याव्यतिरिक्त परदेशी गुंतवणूकीतही वृद्धी होत आहे. अमेरिकेत जवळपास ४० लाख भारतीय वंशाचे नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांनीही आपापल्या क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले आहे.

यावेळी अँटोनी ब्लिंकेन यांनी चीनविरोधात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धोरण योग्य असल्याचे म्हटले. तसेच बायडेन प्रशासनही चीनविरोधात मजबूतीने उभं राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mumbai Local | सर्वांसाठी लोकलबाबत आज होणार निर्णय

कोल्हापुर हादरले : महिलेचा खून करून अर्धवट मृतदेह फेकला तलावात