लोकशाही न्यूज नेटवर्क
उत्तराखंडमध्ये तपोवन टनलच्या आत ड्रिलिंग मशीनचा वापर केला जात आहे. चमोली पोलिसांनुसार, आतापर्यंत एकुण 38 लोकांचे मृतदेह सापडले आहेत. गाळाने भरलेल्या या भुयाराच्या आत अडकलेल्या लोकांच्या संभाव्या स्थानापर्यंत पोहचण्यासाठी एक सहायक भुयारात खोदण्यात आलेले एक भुयार बचाव टीमने शनिवारी आणखी रूंद करण्यास सुरूवात केली.
नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन(एनटीपीसी) प्रकल्पाचे महासंचालक आर. पी. अहिरवाल यांनी सांगितले की, आम्ही भुयारात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहचण्यासाठी तीन रणनितीवर काम करत आहोत. काल केलेल्या भुयाराला एक फुट रूंद केले जात आहे, जेणेकरून गाळाने भरलेल्या भुयाराच्या आत त्या स्थानापर्यंत कॅमेरा आणि एक पाईप पोहचावा, जिथे लोक अडकल्याची शंका आहे. त्यांनी म्हटले की, एक फुट परिघाचे भुयार कॅमेरा आणि पाईप पाठवणे आणि अडकलेल्या लोकांना लोकांच्या ठिकाणाचा शोध घेण्यास मदत करेल.
100 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ लागले कामाला
अहिरवाल यांनी सांगितले की, एनटीपीसीने आपल्या 100 पेक्षा जास्त शास्त्रज्ञांना या कामाला लावले आहे. बचाव पथकाला आत जाण्यासाठी भुयार आणखी रूंद करावे लागेल आवश्यकता भासल्यास असे केले जाईल.
Comments
Loading…