राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीनंतर १ एप्रिल नंतर पुण्यातील निर्बंध आणखी कठोर करण्यात येण्याचे त्यांनी जाहीर केले . याचवेळी कोरोनाच्या लसीकरणा संदर्भात माहिती देत असताना अजित पवार यांनी लस घेतल्याची माहिती दिली.
“देशाच्या पंतप्रधानांनी आता ४५ वर्ष वयाच्या वरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वयोगटातील सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी लसीकरण करून घ्यावं. मीही लस घेतलीय आणि तुम्हीही लसीकरण करुन घ्या”, असं अजित पवार म्हणाले. त्यावर पत्रकारांनी अजित पवार यांना तुम्ही केव्हा लस घेतली? याबाबत विचारलं असता अजित पवार यांनी “मी लस घेतली पण फोटो काढण्याची नौटंकी मी करत नाही. इतरांनी फोटो काढले कारण त्यांना पाहून लोक लस घेतील. पण मी फोटो काढला असता तर लस घेणारेही घेणार नाहीत”, असं अजित पवार म्हणाले.
पुण्यात ३० मार्चपर्यंत कठोर निर्बंध
अजित पवार यांनी पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत यावेळी चिंता व्यक्त केली. १ एप्रिल रोजी कठोर निर्णय घ्यावा लागेल, असं म्हणत अजित पवार यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. या लॉकडाऊनमध्ये रात्रीची संचारबंदी पुन्हा सुरू होणार आहे, लग्न सोडून इतर समारंभ पूर्ण बंद, उद्यान, बाग बगीचे फक्त सकाळीच सुरू राहणार, मॉल, मार्केट, चित्रपटगृह क्षमतेच्या ५० टक्केच सुरू राहणार, सार्वजनिक वाहतूक सुरूच राहणार.
Comments
Loading…