in

ठाण्यात अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर गुरुवारपासून लसीकरण बंद

ठाण्यात पुढील पाच दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवारपासून पुढील आदेश येईपर्यंत ठाण्यातील लसीकरण बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी न करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

मुंबई, ठाण्यासह कोकण परिसरात हवामान खात्याने दिनांक 9 ते 12 जून या काळात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी सर्व केंद्रावरील लसीकरण उद्या 10 जूनपासून बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. लसीकरणाबाबत पुढील निर्देश येईपर्यंत सर्व केंद्रावरील लसीकरण बंद राहणार असून नागरिकांनी यांची नोंद घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

OMG! जुळी, तिळी नाही तर एकाच वेळी 10 बाळांना दिला जन्म; महिलेनं मोडला वर्ल्ड रेकॉर्ड

ट्विटर नरमलं… डिजिटल नियमांचं पालन करण्याचं आश्वासन!