in

Corona Vaccination : देशात 28 दिवसांत 80 लाख नागरिकांना दिली लस

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतामध्ये गेल्या 28 दिवसांत जवळपास 80 लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत लसीकरणाची 1 लाख 64 हजार 781 सत्रे झाली आहेत.

देशभरात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 79 लाख 67 हजार 647 नागरिकांना लस देण्यात आली आहे. यापैकी 59 लाख 9 हजार 136 हे आरोग्य कर्मचारी आणि 2 लाख 5 हजार 511 हे फ्रंटलाइन वर्कर्स आहेत. 12 फेब्रुवारी रोजी 4 लाख 62 हजार 636 इतक्या लाभार्थ्यांना (94 हजार 160 आरोग्य कर्मचारी आणि 3 लाख 68 हजार 477 फ्रंटलाइन वर्कर्स) 10 हजार 411 सत्रांमधून लस देण्यात आली.

भारतातील एकूण लसीकरणापैकी 60 टक्के (59.70 टक्के) संख्या ही 8 राज्यांमधली आहे. या 8 राज्यांमध्ये प्रत्येकी 4 लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. भारतातील एकूण लाभार्थ्यांच्या आकडेवारीपैकी एकट्या उत्तर प्रदेशातील 10.08 टक्के (8 लाख 58 हजार 602) लाभार्थी आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

यंदाची जनगणना जातीच्या आधारावर करावी…आठवलेंची मागणी

Beggar Free Mumbai : भिकारीमुक्त मुंबईच्या दिशेने पाऊल… पोलिसांची मोठी मोहीम!