in ,

मुंबईतील नामांकित हॉटेलमध्ये महापौरांची धड, लसीकरणाबाबत गंभीर बाबींचा खुलासा

मुंबईच्या द ललित या प्रसिद्ध हॉटेलमध्ये लसीकरण होत असल्याचे वृत्त समोर येताच, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अचानक या ठिकाणी धडक दिली. 23 तारखेपासून दिवसाला 500 जणांना लस दिल्याचं वृत्त समोर आले आहे . गंभीर बाब म्हणजे या लसी घरच्या सारख्या साध्या फ्रीजमध्ये स्टोर करण्यात आल्यात.

या गोष्टीवर महापौरांनी आक्षेप घेतलाय. सुश्रुत आणि क्रीटी-केअर 2 हॉस्पिटलने ललित सोबत करार केला. यामध्ये ही परवानगी केंद्राकडून आहे. मात्र याची माहिती महापालिकेला दिलीच नाही. जे गंभीर आहे. ललित हॉटेलमध्ये लस घेतल्यावर राहायला इच्छुक आहेत त्यांना हॉटेलमध्ये ठेवायचे डॉक्टर देखील हॉटेलने हायर केले होते.

“सुश्रुत आणि क्रीटीकेअर 2 हॉस्पिटलने ललित सोबत करार केला. यामध्ये ही परवानगी केंद्राकडून आहे मात्र याची माहिती महापालिकेला दिलीच नाही जे गंभीर आहे. कोल्ड स्टोरेज मेंटेन केलं गेलं नाही यावर माझा आक्षेप आहे. यावर दोन्ही हॉस्पिटलला जाब विचारणार आहे” असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वसई विरार महापालिकेच्या केंद्रावर फ्रंटलाइन सीफेरर्सचे प्राधान्यक्रमाने होणार लसीकरण

दारुबंदीच्या मुद्द्यावरुन रुपाली चाकणकरांचा फडणवीसांना टोला