in

सिरींज कमी असल्याने गोंदियात लसीकरणावर प्रश्नचिन्ह

राज्यात सर्वत्र लसीचा तुटवडा असताना गोंदियात 80 हजार कोरोना लसीचा साठा उपलब्ध आहे. मात्र फक्त ९ हजारच सिरींज असल्याने त्याचा परिणाम लसीकरणावर होण्याची शक्यता आहे.

गोंदिया जिल्ह्यात  सुमारे ८० हजार लसींचा साठा असतानाच आता सिरिंजचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचाही लसीकरणावर परिणाम होत आहे. जिल्ह्याने लसीकरणात ५० टक्क्यांचा टप्पा पार केला असून, ही चांगली कामगिरी झाली आहे. मात्र, असे असतानाच १४० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आल्याने आरोग्य विभागाची अडचण वाढली आहे.

कर्मचारी कमी झाल्याने त्याचा परिणाम लसीकरणावर झाला असून, यामुळेच जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. केंद्रे कमी झाल्याने नागरिकांना आता शहरात सुरू असलेल्या मोजक्याच केंद्रांवर धाव घ्यावी लागत आहे. यामुळे गर्दी वाढत असल्याने एवढी धावपळ करण्यापेक्षा नागरिक लस घेण्याकडे कानाडोळा करत आहेत.

हेच कारण आहे की, दररोज ५०००-६००० पर्यंत लसीकरणाचा आकडा सोमवारी ६५० वर आला आहे. असे असतानाही शासनाकडून जिल्ह्याला लसींचा नियमित पुरवठा होत असून, आता जिल्ह्यात सुमारे ८०००० लसींचा साठा उपलब्ध आहे. मात्र, सिरिंजचा तुटवडा निर्माण झाल्याने त्याचाही परिणाम लसीकरणावर दिसून येत आहे. सिरिंज नसल्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी कमी लसीकरण करण्यात आल्याची माहिती आहे. 

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नाशिकच्या चांदेश्वरीत भाविकांची गर्दी

गोसेखुर्द धरण | पाण्याची आवक नियंत्रणात येत नसल्याने आणखी 5 दरवाजे उघडले