in

वर्ध्यात पावसाची दमदार हजेरी, शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू

प्रतिनिधी : भूपेश बारंगे

आज जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली काही भागात वादळीवाऱ्यासह पाऊस झाल्याने मोठं नुकसान झालं आहे,तर देवळी तालुक्यातील रत्नापुर येथे शेतकऱ्यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील सेलू ,वर्धा , देवळी ,आर्वी , हिंगणघाट तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली यात काही ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे.

देवळी तालुक्यातील पुलगाव, दहेगाव, नाचणगाव, रत्नापुर, कवठा, कुरझडी तर आर्वी तालुक्याच्या रसुलाबाद , सोरटा , विरुळ , सेलू तालुक्यातील पवनार सह इतर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली यात रत्नापुर येथे शेतात काम करत असताना रामा मांगुळकर यांच्या अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला आहे. दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले असून वर्धा देवळी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील बाभूळच्या झाडासह टिनाचे पत्रे तसेच रोडवरील विद्युत खांब वाकले असून काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

त्याचप्रमाणे देवळी शहरातील काही घरामध्ये पाणी सुद्धा गेले असून काही घरांचे शेड सुद्धा उडाले आहे. काही भागात पावसाने मात्र अद्यापही हजेरी लावली नाही आज झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातवरण दिसत होते तर परिसरात गारवा पसरलेला होता. चार तासापासून देवळी शहरासह 10 गावाचा चार तासापासून वीज पुरवठा खंडित झाला आहे यामध्ये चिकणी ,जामनी, पढेगाव ,निमगाव, दहेगाव (स्टे), दहेगाव (गा), केळापूर, वाटखेडा, रत्नापुर , इसापूर या गावात सध्या अंधार पडलेले आहे रात्री उशिरा महावितरण विभागाकडून दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत अद्यापही विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुणे केमिकल आग दुर्घटना प्रकरण; पंतप्रधानांकडून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखाची मदत जाहीर

Gold Price Today| पाहा सोन्याचे आजचे भाव