in

नववधूचा बापमाणूस; आहेराचे 11 लाख केले रुग्णालयाला दान…

लोकशाही न्यूज नेटवर्क : संदीप गायकवाड

वसईतील एका नववधूच्या पित्याने आहेरात आलेल्या व पदरातले असे मिळून 11 लाख रुग्णालयाला दान केले आहेत. पित्याने दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीचे वसईत कौतुक होत आहे.

वसईत ख्रिस्ती बांधवांच्या लग्नसोहळे मोठ्या थाटात पारंपारिक पद्धतीने साजरे होत असतात. असाचं लग्न सोहळा वसईतील वाघोली गावातील पीटर फर्नांडिस यांच्या तानिया या मुलीचा मार्क डाबरे सोबत आप्तस्वकीयांच्या उपस्थीतीत पार पडला. यावेळी लग्नानंतर आलेल्या भेटवस्तू फोडले असता तब्बल पाच लाख रूपये आहेर तानियाला भेटीदाखल आला होता.

पीटर फर्नांडिस यांचा सामाजीक कार्यात नेहमीच हातभार असतो. त्यामूळे फर्नांडिस यांनी मुलीच्या लग्नात आलेल्या पाच लाख आहेर समाज कल्याणासाठी वापरण्याचा निर्णय घेतला.त्याचप्रमाणे पिटर यांनी आपल्याकडील आणखीन सहा लाख रूपये असे आहेराच्या पैशात भर टाकत अकरा लाख रूपयांचा धनादेश वसईतील कार्डीनल ग्रेशियस रूग्णालयाला मदतीसाठी दिला. सामाजिक बांधिलकी जपत पीटर फर्नांडिस यांनी एक वेगळाच आदर्श लोकांपूढे ठेवला आहे.

दरम्यान हे दान करताना यावेळी पिटर फर्नांडिस,मोनिका फर्नांडिस,फादर अंब्रोज फर्नांडिस,तानिया फर्नांडिस – डाबरे,मार्क डाबरे, कार्डीनल ग्रेशियस रूग्णालयाचे चेअयमन अॅन्सन परेरा, थाॅमस ब्रिटो, युरी घोन्सालवीस आदि मान्यवर उपस्थित होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नऊ महिन्यानंतर चीनने का घेतली माघार?

पुणे आत्महत्या प्रकरण : गुन्हेगार पर्यटनासाठी मंत्रालय नंबर वन, निलेश राणेंची बोचरी टीका