in

वसईत संशयास्पद बोटीचे गूढ उलगडले… मालक आणि चालक पोलिसांच्या ताब्यात!

वसईच्या समुद्र किनाऱ्यात संशयास्पद आढळलेल्या बोटीवरील खलाशाला कोस्ट गार्डच्या हेलिकॅप्टरने रेस्क्यू करून बाहेर काढण्यात यश आले आहे. रफिक शेख असे रेस्क्यू करून काढलेल्या खलाशाचे नाव आहे. सध्या बोटीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने बोट समुद्रातच आहे. तिला दुसऱ्या बोटीने बाहेर काढण्यात येणार आहे. खलाशी आणि मालकाला वसई पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.

वसईच्या भुईगाव आणि कळंब परिसरातील समुद्रात ही संशयास्पद बोट खडकावर आदळून कालपासून अडकली होती. संशयास्पद बोट असल्याने सर्व शासकीय यंत्रणा कालपासून सतर्क झाल्या होत्या. वसई पोलीस, कोस्टल गार्ड, मेरिटाईम बोर्ड यांच्याकडून संयुक्त कार्यवाही करून या प्रकरणाचा तपास करण्यात आला.

भुईगाव परिसरातील 15 माईल्ड अंतरावर खोल समुद्रात ही बोट अडकली होती. भाईंदर उत्तन येथील स्टील लॉन्च करणारी ही बोट असून राप्टर काळुखे या व्यक्तीची ही बोट आहे. समुद्रातील दोर तुटून ही बोट भरकटत भुईगाव समुद्रकिनाऱ्यावर आली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अट्टल चोरटे गजाआड, शेतकरी पंपांची चोरी पडली महागात

भिवंडीत एक मजली घर कोसळून एकाचा मृत्यू, तीन जखमी