in

वसई विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता

वसई विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव बेपत्ता असल्याची घटना समोर आली आहे. 2 जूनपासून ते बेपत्ता असल्याची माहीती पालघर पोलिसांनी दिली आहे. या घटनेने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यांना बेपत्ता केले की ते बेपत्ता झाले याचा पोलीस तपास करीत आहेत.

सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव गेल्या एक वर्षापासून कोव्हिडच्या बॉडीची विल्हेवाट लावण्याचा प्रभारी पदावर होते. त्याचसोबत त्यांनी वसई विरार शहरातील अनेक अनधिकृत बांधकाम ही भुईसपाट केली आहेत.

दरम्यान 2 जून रोजी कामावरून सुटल्यानंतर ते घरी परतलेच नसल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात जाधव बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमसिंग जाधव अचानक बेपत्ता झाल्याने महापालिका वर्तुळातही एकच खळबळ उडाली आहे. तर जाधव यांना बेपत्ता केले की बेपत्ता झाले याप्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

व्वा सूनबाई… सासऱ्यांना पाठीवर घेऊन गाठलं रुग्णालय!

अजित पवारांनी सोडलं मौन; ‘अनलॉक’वर उपमुख्यमंत्री म्हणाले…