in

वसई विरार महानगरपालिका भाजपा लढविणार स्वबळावर, प्रसाद लाड यांची घोषणा

वसई विरार- संदीप गायकवाड | वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाने आपली कंबर कसली आहे. महापालिकेतील 115 जागा भाजपा स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा भाजपाचे आमदार तथा वसई विरारचे प्रभारी प्रसाद लाड यांनी आज केली.

प्रसाद लाड यांनी आज नालासोपाऱ्यात पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. वसई विरारमध्ये आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व आहे. भाजपा आणि शिवसेनेची युती असताना हा भाग शिवससेनेकडे असायचा. त्यामुळे आम्ही येथे जास्त लक्ष केंद्रीत केले नाही. ती आमची चूक झाली. पण आता हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या विरोधात जनतेसाठी सक्षम पर्याय म्हणून भाजपा मैदानात उतरली आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आम्ही स्वबळावर सत्ता स्थापन करू, असा विश्वास प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.

यावेळी वसई विरारचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन नाईक, नगरसेवक किरण ठाकूर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘बांगलादेशच्या निर्मितीत इंदिराजींचीच भूमिका महत्वाची, ‘त्यांनी’ इकडे नाही तर, तिकडे मान्य केले…’

अकोला शहरातील नमकीन मार्केटमध्ये भीषण आग