in

नक्षलग्रस्त भागातील महीलांसाठी ‘भाजीपाला लागवड’ प्रशिक्षण मेळावा संपन्न

व्यंकटेश दुदमवार | गडचिरोली जिल्हयातील नक्षलग्रस्त भागातील शेतकरी महीलांसाठी ‘भाजीपाला लागवड’ प्रशिक्षण मेळावा भरवण्यात आला होता. तीन दिवस घेण्यात आलेल्या या प्रशिक्षण मेळाव्याचा आज शेवटचा दिवस होता.यावेळी 114 महीला शेतकऱ्यांना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र, भाजीपाल्यांच्या बियाणांच्या किट्स, झाडे तसेच साड्या वाटप करण्यात आल्या.

गडचिरोली जिल्हयातील तीन चतुर्थांश भुभाग हा वनव्याप्त आहे. त्यामुळे साहजिकच पिक क्षेत्राखालील जमीनीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसुन येते. तथापी, सपाट क्षेत्र पाहुन जिल्हयातील स्थानिक आदिवासी जनता वन जमीनीवरील वृक्ष तोडुन शेती करीत आहेत. परंतु तंत्रशुद्ध शेती करीत नसल्याने त्यातुन उत्पन्नाचे प्रमाणदेखील अत्यल्प असल्याचे दिसुन येते. हीच बाब हेरुन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे संकल्पनेतुन उदयास आलेल्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन गडचिरोली पोलीस दल व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने भामरागड तालुक्यातील महीला शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण देवुन त्यांना आर्थिक स्त्रोत प्राप्त करुन देण्याचे नियोजन केले. त्या अनुषंगाने दि. 13 सप्टेंबर ते दि. 16 सप्टेंबर 2021 या कालावधीत भाजीपाला लागवडीचे नियोजनबद्ध प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे महीलांना विविध फळरोपांवर कलमे करण्याबाबत सुद्धा अवगत करण्यात आले.

प्रशिक्षण आटोपल्यानंतर सदर प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महीला शेतकऱ्यांचा निरोप समारंभ आज पोलीस मुख्यालयातील ‘ एकलव्य धाम ’ येथे घेण्यात आला. त्यात 114 महीला शेतकऱ्यांना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र, भाजीपाल्यांच्या बियाणांच्या किट्स, झाडे तसेच साड्या वाटप करण्यात आल्या.

यावेळी कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक, (प्रशासन) समीर शेख, पोलीस उप अधीक्षक (अभियान) भाऊसाहेब ढोले, कार्यक्रम समन्वयक तथा प्रकल्प संचालक (आत्मा) संदीप कऱ्हाळे, इ. मान्यवर उपस्थित होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देवगडच्या सागरी किनाऱ्यावर आढळला महाकाय व्हेल मासा

स्त्री पात्राच्या कपड्यांवर बुद्धांचं चित्र , भावना दुखावल्याप्रकरणी महेश कोठारेंची माफी