लोकशाही न्यूज नेटवर्क | मुंबईच्या वर्सोवामध्ये सिलिंडरच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी घडली होती. या घटनेप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. होटी वाडीलाल असे आरोपीचे नाव असून त्याला आज सकाळी 11 वाजता कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
वर्सोव्यात सिलिंडरच्या गोदामाला लागलेल्या आगीत सिलेंडरचे अनेक स्फोट झाले होते. या घटनेत 4 जण जखमी झाल्याची माहिती होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 14-15 गाड्या घटनास्थळी दाखल होत युद्धपातळीवर आग विझवण्यात यश आले होते.
दरम्यान या दुर्घटनेप्रकरणी सिलिंडर टाक्या बेकायदेशीर पद्धतीने साठवल्याप्रकरणी होटी वाडीलाल या आरोपीला अटका करण्यात आली आहे. आज सकाळी 11 वाजता त्याला कोर्टात हजर केले जाणर आहे.
Comments
Loading…