in

विकी कौशल करणार मानुषीसोबत रोमान्स !

अभिनेता विकी कौशलने सध्या तो बऱ्याच चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, विकी सध्या यशराज फिल्म्सचा एक नवा चित्रपट करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा एक विनोदी चित्रपट असून अद्याप या चित्रपटाचं नाव ठरलेलं नाही. या चित्रपटात विकी मिस वर्ल्ड म्हणजे मानुषी छिल्लरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

विकीचा हा पहिलाच विनोदी चित्रपट आहे.या चित्रपटाचं नाव ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’असू शकतं असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या चित्रपटात एक विचित्र परिवार दाखवण्यात येणार आहे आणि म्हणूनच या चित्रपटाचं नाव ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’असं असेल अशी चर्चा आहे. परंतु, अद्याप या चर्चांना पुष्टी मिळालेली नाही. हा चित्रपट पूर्ण झाला असला तरी तो या वर्षात प्रदर्शित होणार नाही.

विकी कौशल लवकरच आदित्य धार यांचा ‘अश्वत्थामा’ हा चित्रपट करणार आहे. विकीच्या ‘सरदार उधम सिंग’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून तो अद्याप प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. तर मानुषी सध्या अक्षय कुमारसोबत ‘पृथ्वीराज’ या चित्रपटात काम करत आहे. हा ऐतिहासिक चित्रपट असून ही यशराज फिल्म्सची निर्मिती असणार आहे. याच चित्रपटातून मानुषी बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भाजपच्या दबावामुळे संजय राठोडांचा राजीनामा- पंकजा मुंडे

केडीएमसीच्या कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग