‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ या आपल्या आगामी सिनेमाची तयारी म्हणून विकी कौशलने चक्क धनुर्विद्येचा सराव करायला सुरुवात केली आहे. इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये आर्चरी बोर्डच्या समोर उभा केला असून त्याच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे आणि तो नेमबाजीचा सराव करतो आहे.
ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेमध्ये धनुर्विद्येचे जसे धनुष्य बघायला मिळते, तसे धनुष्य विकीच्या हातात आहे. त्याने ‘नी गार्ड’ही बांधले आहे. टी शर्ट आणि शॉर्ट घातलेला पाठमोरा विकी कौशल समोरच्या आर्चरी बोर्डाकडे बघत उभा आहे, असे या फोटोमध्ये दिसते आहे.
‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ या सिनेमाच्या तयारीसाठी नेमबाजीचा सराव करत असल्याचे विकीने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. या फोटोला कष्टाला पर्याय नाही त्यासाठी वेळ द्यायलाच पाहिजे, असे कॅप्शन देखील देण्यात आले आहे. त्याशिवाय फळ मिळवणे म्हणजे मायक्रोवेव्ह नाही, असे विकीने म्हटले आहे.
अश्वत्थामाच्या रोल व्यतिरिक्त विकी कौशलकडे ‘सरदार उधम सिंग’, ‘तख्त’ आणि फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा बायोपिक आहे.
Comments
Loading…