in ,

विकी कौशलचा “लवकरच होणार साखरपुडा…”कतरिनासोबत नाव चर्चेत?

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा लोकप्रिय अभिनेता आहे. नुकताच विकीचा ‘सरदार उधम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आणि या चित्रपटाला तसेच विकीच्या भूमिकेला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. परंतु विक्कीच्या खासगी आयुष्याविषयी म्हणजेच विकी आणि कतरिना याच्या मधील रिलेशनशिप याची सर्वीकडे चांगलीच चर्चा सुरु आहे. दरम्यान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विकीने सांगितल “तुमच्या मित्रांनी ही बातमी पसरवली आहे. मी सुद्धा लवकरच साखरपुडा करेन, पण त्याची वेळ आल्यावर,” असे विकी म्हणाला आहे.

विकी कौशलने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘ई-टाइम्स’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये पहिल्यांदा विकीने यावर वक्तव्य केलं “तुमच्या मित्रांनी ही बातमी पसरवली आहे. मी सुद्धा लवकरच साखरपुडा करेन, पण त्याची वेळ आल्यावर,” त्यानंतर विकी कौशलचा भाऊ आणि अभिनेता सनी कौशल याने कतरिना आणि विकीच्या साखरपुड्याच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली होती. आणि घरात यांच्या विषयी घडलेले काही मजेदार किस्से सुद्धा सांगितले त्याचबरोबर विकीला बऱ्याचवेळा कतरिनाच्या घराच्या बाहेर फोटोग्राफर्सने स्पॉट केले आहे. त्यामुळे कतरिना आणि विकी यांच्या विषयी चांगलीच चर्चा रंगताना दिसून येत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहिमला आजन्म जन्मठेप

श्रीरामपुर-नेवासा मार्गावर रास्ता रोको