in

अंधश्रद्धेचा बळी! 14 वर्षीय मुलीचा आई-वडिलांनीच पुरला मृतदेह

सातारा येथील दहिवडी परिसरातील शिंदी गावात ही धक्कादायक घटना घडली. अंधश्रद्धेतून १४ वर्षीय मुलीचा बळी गेला आहे. या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी भोंदूबाबांना अटक केली.

१४ वर्षीय मुलीला भूतबाधा झाल्याचे भोंदूबाबांनी तिच्या पालकांना सांगितले. तंत्र-मंत्र करून तिला घरी पाठवण्यात आले. तिला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह आईवडिलांनी परस्पर पुरला. ‘अंनिस’ने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोघा भोंदूबाबांना अटक केली आहे.

मुलीला ताप आला होता. पालकांनी तिला देवऋषाकडे नेले. मुलीला भूतबाधा झाल्याचे देवऋषाने सांगितले. तिला अंगारे-धुपारे करून घरी पाठवले. त्याच रात्री मुलीचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी परस्पर तिचा मृतदेह पुरला. या घटनेची माहिती मिळताच, अंनिसने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघा भोंदूबाबांना अटक केली.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला झटका.. ‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तान

नागपूरात 2 दिवस बाजारपेठा राहणार बंद