in

omicron variant | ओमायक्रॉनसंबंधी विजय वडेट्टीवारांनी दिली ‘ही’ माहीती

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रोन (Omicron) या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट पुन्हा एकदा देशाची चिंता वाढवली आहे. ओमायक्रोनचा संसर्ग इतर देशांमध्ये पसरताना दिसत आहे. यावेळी लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची गरज असून, संपूर्ण लसीकरण करण्यात दिरंगाई करू नये, असेही केंद्रीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यादरम्यान महाराष्ट्रात सुरक्षेच्या दृष्टीने नवी नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

ओमायक्रॉनसंबंधी लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं जात असल्याचा आरोप यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केला. तसंच लोकांनी घाबरुन जाऊ नये असं आवाहन केलं. ते म्हणाले की, “ओमायक्रॉनसंबंधी लोकांमध्ये फार दहशतीचं वातावरण निर्माण केलं गेलं असं माझं स्पष्ट मत आहे. म्युकरमायकोसिसची जितकी तीव्रता होती किंवा जेवढं नुकसान होत होतं तसं यात काही नाही. लोकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही”.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Cyclone Jawad ; पुन्हा अस्मानी संकट ! या राज्यात ‘जवाद’ चक्रीवादळ धडकणार

अंबरनाथमध्ये परदेशात जाऊन आलेल्या मुलीला कोरोना