in

Vijay Wadettiwar | राज्यात पावसामुळे 436 तर वीज पडून 196 जणांचा मृत्यू

राज्यात पावसामुळे शेती आणि मालमत्तेच्या नुकसनासह मोठी जिवितहानी झाली आहे. यावर्षी सातत्याने पूर, अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. विजय वडेट्टीवार पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठवाड्यातील 10 पैकी 7 जिल्ह्यांमध्ये 180 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. धरणे ओव्हरफ्लो झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.तसेच २२ लाख हेक्टर जमीन पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे. मराठवाड्यात ४५२ पैकी 381 महसूल क्षेत्रात अतिवृष्टी, त्यातील १२७ असे क्षेत्र जिथे ४-४ ते ८ वेळा अतिवृष्टी हे प्रचंड नुकसान आहे.

पावसामुळे राज्यात जनावरं वाहून गेल्याच्या आणि मृत्यूच्या घटना घडल्या. यावर्षी सातत्याने पूर, अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. अजूनही 436 पैकी 6 मृतदेह मिळालेले नाहीत. तसेच 136 जण जखमी झाले आहेत, 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

मुख्यमंत्री काय म्हणाले ?

आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी असे निर्देश त्यांनी दिले

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

खुशखबर! झोपडीधारकांना 300 चौरस फुटांचा फ्लॅट मिळणार

दुधना नदीला आलेला पूर ड्रोन कॅमेऱ्यात कैद