in

अंबरनाथ तालुक्यात गावठी दारूचे तळ उध्वस्त, तिघांवर गुन्हे दाखल

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात गावठी दारूच्या तळांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलीये. ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केलीये. मलंगगड परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल परिसर असून त्याचा आधार घेत स्थानिक दारू माफियांनी गावठी दारूचे तळ उभे केले आहेत.

याची माहिती मिळताच ठाण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने मलंगगड परिसरात धडक कारवाई केली. यामध्ये हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभार्ली आणि विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माणेरे गावाच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली.

या भागात गावठी दारू तयार करण्यासाठी साठवलेलं तब्बल १६ हजार ८०० लिटर रसायन नष्ट करण्यात आलं. या नवसागर मिश्रित रसायनाची किंमत जवळपास ४ लाखांच्या घरात होती. याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आधी सिनेमा पाहा मग पैसे द्या.. मराठीतील पहिला सिनेमा युट्युबवर

पुसदमध्ये गोळीबारात एकजण ठार, भरदिवसा रस्त्यावर थरार