in ,

हक्कभंग प्रकरण : अर्णब गोस्वामी फिरसे हाजीर हो…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना आज विधिमंडळाच्या हक्कभंग समिती समोर हजर राहावे लागणार आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेत अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला होता.

विधिमंडळात हजर राहण्यासाठी समितीने त्यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक आणि जामिनावर सुटका झाली आहे.

या प्रकरणी अर्णब यांना यापूर्वीही नोटीस बजावली होती. मात्र, अर्णब गोस्वामी हजर न राहिल्याने आता आणखी एकदा समन्स बजावण्यात आले आहे. त्यानुसार अर्णब यांना आज विधिमंडळात हजर राहावे लागणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सहायक लेखाधिकाऱ्यांनी मागितली घोडसवारीची परवानगी

Maharashtra budget session | शेतकरी नुकसानभरपाई मुद्द्यावरुन भाजप आक्रमक