in

पंतप्रधान मोदींच्या बाग्लांदेश दौऱ्यानंतर हिंसा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांग्लादेशचा दौरा केला. यानंतर बांग्लादेशमधील एका कट्टर मुस्लिम संघटनेने रविवारी हिंदू मंदिर आणि ट्रेनवर हल्ला केला. पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात या संघटनेने आंदोलन पुकारले होते, या आंदोलनाला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये हाणामारी झली. या घटनेत आतापर्यंत 10 आंदोलकांचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी पंतप्रधान मोदी बांग्लादेशची राजधानी ढाकात होते. तेव्हा मोदींनी बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस दिले होते. पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसांचा बांग्लादेश दौरा आटपून शनिवारी रात्री दिल्लीत पोहोचले. मोदी यांच्या बांग्लादेश दौर्‍यावेळी अनेक ठिकाणी हिंसक प्रदर्शन सुरू होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नक्षलवाद्यांवर नजर ठेवण्यासाठी DRDO ने तयार केलेला अत्याधुनिक ड्रोन कोसळला

नवनीत राणांचा विनामास्क आदिवासींसोबत बेफाम डान्स!