in

डोंबिवलीमध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये तुंबळ हाणामारी

सुरेश काटे, कल्याण-डोंबिवली | राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी जिल्हा समन्वयक पदी निवड केलेल्या डोंबिवलीतील पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीच्या पाच ते सहा कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

डोंबिवली एम आय डी सी परिसरातील कावेरी चौकामध्ये रस्त्याचे काम सुरू असताना एका नागरिकांनी रस्त्याच्या कामाबाबत विचारणा केली असता शिवसेना वार्ड अध्यक्षांनी सर्वसामान्य नागरिकाला अरेरावी केली. याचा राग तेजस पाटील यांच्या समर्थकांना आला. त्यांनी विचारले नागरिकांना व्यवस्थित बोला असे बोलल्याचा राग मनात धरून शिवसेनेचे नवनिर्वाचित कल्याण ग्रामीण विधानसभा जिल्हा समन्वयक योगेश म्हात्रे यांनी व त्यांच्या तीस ते पस्तीस समर्थकांनी तेजस पाटील यांच्या चार ते पाच कार्यकर्त्यांना काठी बांबू लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये तेजस पाटील यांचे तीन ते चार समर्थक गंभीर जखमी झाले आहेत.

शिवसेनेचे नवनिर्वाचित कल्याण ग्रामीण विधानसभा जिल्हा समनवयक योगेश म्हात्रे यांनी जाब विचारणाऱ्या नागरिकांच्या व्हिडिओ बाबतीत काही माहिती नसल्याचे स्पष्ट केला आहे श्रेय वादामुळे हाणामारी झाल्याचे सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लाचलुचपत विभागाची कारवाई; रेल्वे पोलीस उपनिरीक्षक गोपिका मानकर यांना अटक

Cruise Drug Case | आर्यन खानचा जेलमधला मुक्काम वाढला