in

राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’वर पाहुण्यांची मांदियाळी

काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘शिवतीर्थ’ या आपल्या नवीन निवासस्थानात गृहप्रवेश केला. त्यांच्या या नवीन घरी अनेक राजकीय मंडळी सदिच्छ भेट घेत आहेत. राज ठाकरे हे कृष्णकुंजवर राहत होते. पण, त्यांनी कृष्णकुंजशेजारीच शिवतीर्थ हे घर बांधलं आहे

काही दिवसांपूर्वीच माजी क्रिकेटर सचिन तेंडूलकर यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्या भेटीचा व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल झाले होते. त्यानंतर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या पत्नीसोबत राज ठाकरेंची शिवतीर्थवर भेट घेतली.

राज ठाकरेंच्या नव्या घरी आता अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीही राज ठाकरेंची भेट घेऊन भोजनाचा आस्वाद घेतला. त्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भगवा सोडून हिरवा झेंडा हाती घेतला

“वस्तुस्थिती आपणापासून लपवली गेली असेल, म्हणूनच…,” नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना पत्र