in

अतिमुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy RainFall) पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक असणार आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच घाट भागातही जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आजपासून बुधवारपर्यंत अतिमुसळधार पाऊस भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबर रोजी म्हणजेच पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 14 सप्टेंबरला पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 15 सप्टेंबरला पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. 16 सप्टेंबरला मात्र पावसाचा जोर काहीशा प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Malwani malad (west).

भूपेंद्र पटेल आज घेणार गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ