अँटिलिया स्फोटक प्रकरणी सचिन वाझे यांना आज एनआयए कोर्टात हजर करण्यात आले होते. या प्रकरणात मला बळीचा बकरा बनवले जात असल्याचा दावा त्यांनी न्यायालयता केला. त्यांची आज कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांच्या कोठडीत 3 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
मी दीड दिवस या प्रकरणाचा तपासअधिकारी होतो. मी कोणत्याही गुन्ह्याची कबुली एनआयएकडे दिलेली नाही, असेही सचिन वाझे यांनी न्यायालयात सांगितले. आपल्याला आणखी काही सांगायचे आहे, असे ते म्हणाले. त्यावर, जे सांगायचे आहे ते लेखी स्वरुपात द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.
Comments
Loading…