in ,

Maratha Reservation | “आम्ही सरकारसोबत चर्चेसाठी तयार”


मराठा आरक्षणावरून आम्ही राजकारण करणार नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्दावर राज्य सरकारने चर्चेसाठी बोलावलं तर आम्ही येऊ , अशी भूमिका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. जळगावातील वादळग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते.

भाजपाला डॅमेज कंट्रोलची गरज नाही, तर आघाडी सरकारला डॅमेज कंट्रोलची गरज आहे, असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला. शरद पवार यांना दिलेल्या सदिच्छा भेटीबाबत ते म्हणाले, आम्ही राजकीय वैचारिक विरोधक आहोत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या तब्येत खालावली व त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या तब्येची विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतली होती. यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona third wave | बालरोगतज्ज्ञांना पालिका देणार विशेष प्रशिक्षण

“शरद पवारांनी नक्कीच फडणवीसांना मार्गदर्शन केलं असेल”