in

सरकारमध्ये आमचा हस्तक्षेप नाही,पण राष्ट्रहितासाठी आम्ही दबाव टाकतो – मोहन भागवत

अमोल धर्माधिकारी | पुणे : भारतीय जनता पक्ष एक राजकिय पक्ष आहे. त्यांची एक वेगळी कार्यकारणी आहे. त्यांच्यात पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत, आणि ते स्वतंत्र चालतात. फक्त संघाचे स्वयंसेवक त्या पक्षात नसून इतरही लोक आहेत. स्वयंसेवक हे संघाच्या विचारानेच काम करतात पण आम्ही कधी नरेंद्र मोदी यांना थेट फोन करुन हे करा ते करा अस सांगत नाही. आम्ही हस्तक्षेप करत नाही, सरकारी चौकटीत आम्ही जात नाही. पण ज्या गोष्टी राष्ट्रहिताच्या असतात त्या आम्ही सांगतो अस विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केल आहे.

राजस्थानमधील उदयपूर येथे भीलवाडा येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना भागवत यांनी, आम्ही सरकारी कामात हस्तक्षेप न करता आणि संविधान आणि कायद्याला धरुन समाजाला हे हवं ते करण्यासाठी दबाव टाकतो. राम मंदिर बनवण्यासाठी जे काम करतात त्यांसोबत स्वयंसेवक जाणार, अन्य कुणी पक्ष म्हणाले, आम्ही येणार तर आम्हीही ठरवू. त्यामुळे आमची राष्ट्रहित ही एक कल्पना आहे. त्याच्यावर जो चालेल त्याच्यासोबत आम्ही आहे, असं ही ते म्हणालेत.

याबाबतच उदाहरण देताना भागवत म्हणाले की सध्या केरळ मध्ये जी कोरोनाच संकट सुरु आहे. त्याबद्दल दीडशेहून अधिक केंद्रावर तेथील कम्युनिस्ट सरकारने आम्हाला बोलावून तुम्ही काम करा आम्हाला हे न झेपणार आहे. तेव्हा आम्ही ते केलं, अस भागवत सांगायला विसरले नाहीत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IPL वर पुन्हा कोरोनाच संकट?; ‘या’ संघातील महत्त्वाचा खेळाडू कोरोनाबाधित, संपर्कातील सहा जण विलगीकरणात

राज्यातील पोलिसांना कडक आदेश दिले असते ; फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका