in ,

भारतातील स्वच्छतेचा पहिला पुरस्कार आम्हीच घेणार; शिर्डी नगरपंचायतचा संकल्प

कुणाल जमदाडे | शिर्डी | केंद्र सरकार आयोजित स्वच्छ सर्वेक्षणात अनेकदा बाजी मारणाऱ्या शिर्डी नगरपंचायतने यंदाही आपली देदीप्यमान परंपरा कायम राखली आहे.

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ या स्पर्धेत शिर्डी नगरपंचायतने कचरा मुक्त शहर व श्री स्टार गटात दुसरा क्रमांक पटकावला आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शनिवारी दिल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या शानदार कार्यक्रमात नगरपंचायतला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. काही वर्षांपूर्वी अस्वच्छ शहर असा कुलौकिक असलेल्या शहराने २०१७ पासून स्वच्छ सर्वेक्षणात अनेकदा राष्ट्रीय पातळीवरील बक्षिसे पटकावली आहेत. या यशात शिर्डीकर, भाविक, मान्यवर, साईबाबा संस्थान, नगरपंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचं मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी मुलाखत देतांना सांगितलं. पुढच्या वर्षी भारतातील सर्वात सुंदर शिर्डी शहर हा पुरस्कार घेण्याचा आमचा संकल्प असल्याचं मुख्याधिकारी डोईफोडे यांनी सांगितलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

प्रियांकाने सोशल मीडिया वरून काढले जोनस आडनाव

रस्ता दुरुस्ती झाला नाही तर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर 12 ग्रामपंचायतीचा बहिष्कार