in ,

पश्चिम महाराष्ट्राला नेहमी झुकते माप दिले जात; शिवसेना नेते रामदास कदम यांचा संताप

पश्चिम महाराष्ट्रातील कोयना धरणातील वीजनिर्मितीनंतर समुद्रात वाहून जाणारे ६७ TMC पाण्यावर कोकणातील जनतेचा हक्क आहे. ते पाणी नाणार प्रकल्पाला देण्याचा प्रयत्न केला तर तो आपण हाणून पाडू, असा इशारा शिवसेनेचे सदस्य रामदास कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिला. कोकणावर सतत अन्याय होत असून, पश्चिम महाराष्ट्राला नेहमी झुकते माप दिले जात असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.

राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीचे सरकार असून, शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य असलेल्या रामदास कदम यांनी विरोधकांसारखा सरकारी धोरणावर दांडपट्टा चालविला. विदर्भ, मराठवाडा या मागास भागांच्या धर्तीवर कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्यात यावे, अशी मागणीही कदम यांनी केली. जनहिताच्या प्रश्नाबाबत सरकारला लोकप्रतिनिधी या नात्याने चार-पाच पत्रे पाठवल्यानंतरही कामे मार्गी लागत नाहीत, अशी त्यांची तक्रार होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Assam assembly election 2021 | आसाममध्ये भाजपा ९२ जागांवर निवडणूक लढणार

आता घरी लग्न, समारंभ करण्यासाठीही घ्या प्रशासनाची परवानगी