in

लक्षद्वीप बेटावर नक्की काय गोंधळ सुरू आहे ? जाणून घ्या कोण आहेत प्रफुल खोटा पटेल

लक्षद्वीप बेट सध्या खूप चर्चेत आहेत. तेथील प्रभारी प्रशासक प्रफुल खोडा पटेल यांची तेथे अरेरावी सुरू असून त्यांच्यामुळे लक्ष्यद्वीप बेटावरील सामाजिक वातावरण गढूळ झाल्याचा आरोप केला जातोय. प्रफुल खोटा पटेल कोण आहेत. पर्यटकांचं आवडत ठिकाण असलेलं लक्षद्वीप बेट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. याला निमित्त ठरलेत ते तेथील प्रशासक प्रफुल खोडा पटेल.काही जाचक नियम बनवून या बेटावरील सामाजिक वातावरणात त्यांनी खोडा टाकल्याचा आरोप होतोय. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून दखल घेण्याची मागणी केलीय.

वास्तविक लक्षद्वीप बेटावर 90 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या मुस्लिम आहे. अशा बेटावर बीफबंदी करण्यामुळे सामाजिक वातावरण ढवळून निघालंय. या नियमावलीच्या निषेधार्थ भाजपाच्या युवा मोर्चाच्या आठ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय. तरीही प्रफुल खोटा पटेल प्रस्ताव मागे घेण्यास तयार नाहीत. म्हणून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून यात हस्तक्षेप करण्याची विनंती केलीय. शिवाय वरील जाचक नियम मागे घेण्याची विनंती केलीय.

त्याचप्रमाणे प्रफुल खोटा पटेल यांच्या नियुक्तीनंतर लक्षद्वीपमध्ये कोरोनाचा प्रवेश झाल्याचाही आरोप होतोय.आज लक्षद्वीप बेटावर हजारो कोरोनाचे रुग्ण आहेत.
या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमिवर प्रफुल्ल खोडा पटेल यांना माघारी बोलवावे, अशी मागणी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पंतप्रधान मोदींकडे अलीकडेच केलीय. लक्षद्वीपमधील मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याच्या उद्देशाने हे ‘लोकविरोधी’ नियम लागू करण्याच्या प्रशासक पटेल यांच्या कृतीमुळे जनक्षोभ उसळत असल्याचा ट्विटही स्टॅलिन यांनी केलंय. तर लक्षद्वीपच्या नागरिकांना पाठिंबा देण्यासाठी केरळ विधानसभेतही संयुक्त ठराव मांडला जाईल, असं मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी स्पष्ट केलंय.

प्रफुल खोटा पटेल यांनी गेल्या काही दिवसांत प्रस्तावित केलेले निर्णय लक्षद्वीपमधील नागरिकांना मान्य नाहीत. त्यामुळे #SaveLakshadweep अशी मोहीम सुरू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मोदींकडून ओडिशा, बंगाल अन् झारखंडला 1000 कोटींची आर्थिक मदत

महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी, कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरला