in ,

काय खास आहे ‘गोदावरी’ या सिनेमाच्या नावात; जाणून घ्या जितेंद्र जोशी काय म्हणतात

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशीने चित्रटांमध्ये विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. तसेच गोदावरी चित्रपटातून त्यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. आता जितेंद्र जोशी निर्मित गोदावरी या सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. या सिनेमाबद्दल जितेंद्र जोशीने पोस्ट शेअर करत खास माहिती दिली आहे. या सिनेमाचे गोदावरी नाव ठेवण्याचे काय कारण आहे हे जितेंद्रने या पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.

जितेंद्र जोशीने त्याचा गोदावरीच्या गाठावरचा एक फोटो शेअर करत म्हटले आहे की, ’50 दिवस बाकी..त्या दिवशी नाव ठरलं चित्रपटाचं !!कथेचं बीज होतं फक्त निखिल च्या मनात आणि माझ्या डोक्यात का कुणास ठावूक नाशिक!!23 ऑगस्ट ला नाशकात दिवसभर फिरल्यानंतर रात्री निखिल म्हणाला चित्रपटाचं नाव” गोदावरी” !!! मी साशंक होतो परंतु का कुणास ठावूक आश्र्वस्त देखील. दुसऱ्या दिवशी सुद्धा प्राजक्त देशमुख नाशिक फिरवत होता . सोबत राहून वेगळं नाशिक ऐकवत / दाखवत होता

24 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी नाशिक मध्ये गोदावरी च्या तीरावर काढलेला हा फोटो. . चित्रपट बनवण्या आधी लोकांच्या आणि नाशिकच्या अंतरंगात डोकावून बघत होतो. गोदावरी ला श्रद्धेने नमस्कार करून मनापासून प्रार्थना केली की हा सिनेमा तुझ्या काठावर येऊन करतो आहे. संपूर्ण जबाबदारी तू घे आणि सांभाळ आम्हा सर्वांना. असंख्य अडचणी असंख्य गोष्टी पार पाडत गोदावरी चं चित्रण निखिल आणि टीम ने यशस्वीरीत्या पार पाडलं.

आज च्या घडीला 2 मानाच्या आतंरराष्ट्रीय महोत्सवात निवड होऊन तिथल्या वेगवेगळ्या प्रेक्षकांची पसंती मिळवून बरोब्बर 50 दिवसानंतर 3 डिसेंबर रोजी आपला गोदावरी चित्रपट तुम्हा सर्वांच्या भेटीला येतोय. मी निश्चिंत आहे. कारण जबाबदारी गोदामाई ने घेतली आहे; त्याच दिवशी!!!’

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईत टीव्हीमध्ये झाला स्फोट

मनमोहन सिंग रुग्णालयात दाखल; पंतप्रधान मोदींनी केलं टि्वट