in

CM Uddhav Thackeray : हीच ती वेळ … मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात जनतेशी साधणार संवाद

कोरनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्र आता लॉकडाउनच्या उंबरठ्यावर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 8:30 वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय संवाद साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवादामध्ये काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. 

मुख्यमंत्री राज्यातील जनतेशी काय बोलणार?

वीकेंड लॉकडाऊन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रथमच जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  सरकारी आणि खासगी कार्यलयांमध्ये वर्क फ्रॉम होम सुरु करणे, कोरोना लसीकरण, याबद्दल बोलण्याची शक्यता आहेच त्याबरोबर लॉकडाउनबाबत मोठी घोषणा करु शकतात

महाराष्ट्रात 12-13 दिवसांचा लॉकडाऊन?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 12 ते 13 दिवसांचा लॉकडाउन असू शकतो. याच लॉकडाउनच्या निर्णयावर हसन मुश्रीफ म्हणाले होते की, परप्रांतिय कामगारांनी महाराष्ट्र सोडू नका. तुमची सगळी काळजी राज्य सरकारकडून घेतली जाईल.

काय म्हणाले अस्लम शेख?

आज मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही जनतेशी संवाद साधला. त्यांनी सांगितले होते की, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घोषणा करतील. “महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊनची (Maharashtra Lockdown) घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेआज निर्णय घेतील. इतकंच नाही तर लॉकडाऊनबाबत नियमावली आजच करण्यात येईल ”, असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बारामतीत ‘लोकशाही’च्या प्रतिनिधीवर गुन्हा… सत्य समोर आल्यानंतर राष्ट्रवादीची आगपाखड

Corona Virus Updates | देशात वाढतोय कोरोना , नवी आकडेवारी चिंता वाढवणारी