in

सावधान ! WhatsApp वर असा मेसेज आल्यास सतर्क राहा

जर तुम्हाला WhatsApp वर एका सर्व्हेमध्ये भाग घेऊन फ्री गिफ्ट जिंकण्याचा मेसेज आला असेल, तर सावधान राहा. या मेसेजमुळे तुमचं बँक अकाउंट खाली होण्यासह पर्सनल डेटाही चोरी होण्याचा धोका आहे. सध्या WhatsApp वर अ‍ॅमेझॉन संबंधित एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये ‘अ‍ॅमेझॉनची 30वी अ‍ॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन…सर्वांसाठी गिफ्ट.’ त्याशिवाय या मेसेजसह एक URL(https://ccweivip.xyz/amazonhz/tb.php?v=ss1616516) ही देण्यात आला आहे. मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या लिंकवर क्लिक करुन युजर्स फ्री गिफ्ट मिळवू शकतात.

या लिंकवर क्लिक केल्यानंतर एका सर्व्हे पेजवर आणलं जाईल. यात युजर्सला चार प्रश्न विचारले जातील, ज्यात दावा करण्यात आला आहे की, हे प्रश्न अ‍ॅमेझॉनची सर्विस इंप्रूव्ह करण्यासाठी विचारण्यात आले आहेत. हे प्रश्न युजर्सचं वय, लिंग, अ‍ॅमेझॉनची सर्विस कशाप्रकारे रेट केली आहे यासंबंधी असतात. तसंच यात युजर्सच्या डिव्हाईससंबंधीही प्रश्न विचारले जातात, की ते अँड्रॉईड फोनचा वापर करतात की आयफोनचा वापर करतात. तसंच लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी या पेजवर एक टायमरही चालवलं जातं.

सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर युजर्सच्या स्क्रिनवर अनेक गिफ्ट बॉक्स येतात. त्यानंतर सर्व्हेमध्ये भाग घेणाऱ्या 100 लकी विनर्सला स्मार्टफोन देण्याचा दावा केला जात आहे. येथून खरी ट्रिक सुरू होते. ज्यामध्ये युजर्सला हे क्विज 5 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स किंवा 20 पर्सनल चॅटवर पाठवण्याचं सांगितलं जातं. पण युजर्सला यात कोणत्याही प्रकारचं गिफ्ट मिळत नाही. अशा मेसेजमध्ये असणाऱ्या URL स्कॅमर्सद्वारा तयार केले जातात, ज्याद्वारे युजर्सची माहिती मिळवली जाऊ शकेल. त्यामुळे अशा फ्री गिफ्ट्सच्या नादात मोठ्या फसवणूकीला बळी पडू नका.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

म्हाडाकडून टाटा कॅन्सर रुग्णालयाला 100 फ्लॅट्स, रुग्णांच्या नातेवाइकांच्या सोयीसाठी निर्णय

तटरक्षक दलाची कामगिरी : ३ बोटी ताब्यात घेत शस्त्रांसह ५००० कोटींचे ड्रग्ज जप्त