in

WhatsApp Web साठी नवीन फिचर लाँच

आपल्या प्रायवसी पॉलिसीमुळे चर्चेत असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप त्याच्या युजर्ससाठी नेहमीच नवनवे फिचर्स लाँच करते. आता कंपनीने अजून एक नवीन फिचर आणलं असून याद्वारे व्हॉट्सअ‍ॅप वेबवरुनही (डेस्कटॉप व्हर्जन) ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलिंगची सेवा मिळणार आहे.

अनेक दिवसांपासून या फिचरची चर्चा होती, सूत्रांना नुसार कंपनीने हे फिचर रोलआउट करण्यास सुरुवात केल्याचं समजतंय. व्हॉट्सअ‍ॅप वेबमध्ये बीटा युजर्ससाठी व्हिडिओ/ऑडिओ कॉलिंगच्या फिचरवर चाचणी सुरू होती. आता हे फिचर कंपनीने सामान्य युजर्ससाठीही रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. व्हॉट्सअ‍ॅप वेब/डेस्कटॉप व्हर्जन 2.2104.10 मध्ये हे फिचर रोलआउट केलं जात आहे.

या फिचरनुसार, कॉल आल्यानंतर WhatsApp Web मध्ये एक नवीन विंडो पॉप अप होईल, तिथून युजर्स कॉल स्वीकारू किंवा नाकारु शकतात. तिथे कॉलिंगसाठी पर्याय दिलेला असेल. त्याचप्रमाणे WhatsApp Web मध्ये कॉलिंगदरम्यान युजर्स मुख्य व्हॉट्सअ‍ॅप इंटरफेसवरही चॅटिंग करु शकतात, कारण इथे कॉलिंगसाठी वेगळी पॉप-अप विंडो ओपन होणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Job Updates : रिझर्व्ह बँकेत भरती

Maharashtra budget session | जळगाव प्रकरणात तथ्य नाही- अनिल देशमुख