in

हिंगणघाटच्या ‘निर्भया’ला न्याय कधी मिळणार ? देवेंद्र फडणवीसांचा सरकारला सवाल

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या हिंगणघाट जळीत कांड प्रकरणावर आज विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले होते. यावेळी त्यांनी महिला अत्याचार रोखण्यासाठी नुसते कायदे करून फायदा नाही, न्यायही मिळाला पाहिजे. हिंगणघाटच्या ‘निर्भया’ला न्याय कधी मिळणार असा सवाल करत त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

फडणवीस पुढे म्हणाले, राज्यात महिला अत्याचाराच्याच नव्हे, तर दलित अत्याचाराच्या घटनाही वाढत चालल्या आहेत आहेत. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था केवळ आकड्यांवर न ठरवता ती ‘सेफ्टी पर्सेप्शन’वर ठरवण्यात यायला हवी, असा सल्लाही त्यांनी दिला.

हिंगणघाटच्या प्रकरणात अजूनही न्याय मिळाला नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त करत सरकारला फटकारले. महिला अत्याचार रोखण्यासाठी नुसते कायदे करून फायदा नाही. केलेल्या कायद्याचं नेमकं काय होतंय याकडेही सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. तसेच महिला अत्याचार रोखण्यासाठी सरकारने अजूनही महत्त्वपूर्ण पावले उचललेली नसल्याचीही टीका त्यांनी यावेळी केली. तसेच हिंगणघाटच्या निर्भयाला अजूनही न्याय मिळालेला नाही, ना आर्थिक मदत मिळाली आहे, ना तिच्या कुटुंबातल्या कुणाला नोकरी मिळाली असल्याचीही टीका सरकावर केली आहे.

गृहमंत्री काय म्हणाले होते ?

या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हिंगणघाट जळीतकांडचा हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार असल्याची माहिती दिली होती. शिवाय पीडित तरुणीच्या भावाला सरकारी नोकरी देण्याची ग्वाहीही यावेळी गृहमंत्र्यांनी दिली.

काय आहे प्रकरण?

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदेरी चौकात आरोपी विकेश नगराळे तिच्या नेहमीच्या मार्गावर आधीच दबा धरून बसला होता. तिला पाहताच त्याने दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि अतिशय निदर्यतेने तिला जाळण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा केल्यानंतर काहींनी तिच्या अंगावर पाणी ओतून आगीवर नियंत्रण आणले. मात्र, तोपर्यंत ती ४० टक्के भाजली. तिला आधी हिंगणघाट रुग्णालयात आणि नंतर नागपूरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तिचा चेहरा पूर्णपणे जळाला असून, ती वाचाही गमावण्याची भीती आहे. तसेच डोळे गमावण्याचीही शक्यता आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. पिडित शिक्षिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडितेला जाळणारा आरोपी विकी नगराळेला 20 फेब्रुवारीपर्यंत 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अॅन्टिलिया स्फोटक प्रकरण : गृहमंत्री कोणाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत? फडणवीस यांचा सवाल

जळगाव वसतीगृहातील गैरप्रकाराबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाची गृहमंत्री अनिल देशमुखांना नोटीस