लोकशाही न्यूज नेटवर्क
विनाअनुदानित शिक्षकांचा गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू असून राज्य सरकारने त्यांना अद्याप दिलासा दिलेला नाही. त्यामुळे आपल्याला ‘अच्छे दिन’ कधी येणार, याची या शिक्षकांना प्रतिक्षा आहे.
आझाद मैदानावर विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. हजारोंच्या संख्येने ते येथे जमले आहे. गेल्या 16 दिवसांपासून अनुदान आणि वेतनासाठी हे आंदोलन सुरू आहे. तसे पाहिले तर, त्यांची ही मागणी गेल्या 20 वर्षांपासूनची आहे. पण अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही.
शिक्षण विभागातील अधिकारी झारीतील शु्क्राचार्य ठरत आहेत, असा आरोप या शिक्षकांनी केला आहे. हे शिक्षणाधिकारी योग्य आणि पूर्ण माहिती देत नसल्याने सरकारला निर्णय घेता नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राज्यात दीड-दोन महिन्यांपूर्वी शिक्षक आमदारांच्या निवडणुका झाल्या. विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे शिक्षक आमदार काय करत आहेत, असाही प्रश्न आंदोलक शिक्षकांचा आहे. शिक्षकांच्या मागण्याकडे शिक्षक आमदार पाहणार नसतील, तर उपयोग काय? असे त्यांचे म्हणणे आहे.
शिक्षकांच्या या आहेत मागण्या –
- 13 सप्टेंबर 2019 च्या जीआरची अंमलबजावणी करावी.
- 20 टक्के घोषित अनुदान आणि 40 टक्के वाढीव वेतन तातडीने देणे
- हा निधी देण्याचा आदेश प्रचलित धोरणाने तात्काळ काढावा
- शिवाय सर्व अघोषित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, नैसर्गिक तुकड्या यांची आर्थिक तरतुदींसह घोषणा करावी
Comments
Loading…