in

बारावीच्या परीक्षा होणार की नाही, सुप्रीम कोर्टात पार पडली सुनावणी

सीबीएसई (CBSE) म्हणजेचं केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्डाच्या आणि आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील याचिकेवरील सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पार पडली आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई, आयसीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका अ‌ॅड. ममता शर्मा यांनी केली होती. न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या बेंच समोर आता गुरुवारी सुनावणी होईल.

ममता शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी सुरु झाली. यामध्ये युथ बार असोसिएशन ऑफ इंडियानंन 521 विद्यार्थ्यांच्या वतीनं इंटर्व्हेन्शन याचिका दाखल केली. ममता शर्मा यांनी सीबीएसईनं बोर्ड परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी याचिका दाखळ केली आहे. तर, इंटर्व्हेन्शन याचिका दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांनी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा संदर्भ देण्यात आला. 15 जुलै ते 26 ऑगस्ट दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षा विद्यार्थ्यांवर वैद्यकीय आपत्ती ओढावणाऱ्या ठरतील. ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा घेऊ नये, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Watch Video; लेकीच्या लग्न विधींवेळी भाजप आमदाराचा तुफान डान्स; कोरोना नियमांचे उल्लंघन