in

कोरोनाचा फैलाव नेमका झाला कुठून? डब्ल्यूएचओच्या पथकालाही झाला नाही उलगडा

लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोना विषाणूने जगभरात हैदोस घातला. अनेकांनी जीव गमावले तर, अनेकांचे रोजगार गेले. या विषाणूचा फैलाव चीनमधील वुहान येथून झाला. त्याचा तपास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) पथक वुहानमध्ये दाखल झाले. पण त्यांच्या हाती काहीही लागले नाही.

जगभरात कोरोनाचा फैलाव वुहान येथूनच झाल्याचा दावा करण्यात येत होता. याच पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओचे पथक चीनमध्ये दाखल झाले. वुहानमधील एका प्रयोगशाळेतूनच करोना विषाणूचा संसर्ग जगभरात झाला, असे सांगितले जात होते. त्यादृष्टीने तपास झाला. पण असे कोणतेही पुरावे या पथकाला सापडलेले नाहीत. डब्ल्यूएचओसह चिनी तज्ञांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. सन 2019च्या डिसेंबर महिन्यापूर्वी वुहानमध्ये करोना विषाणूचे कोणतेही अस्तित्व किंवा लक्षणे आढळली नाहीत, असे डब्ल्यूएचओच्या बेन एम्ब्रेक यांनी सांगितले.

डिसेंबर 2019पासून फेलाव
वुहानमध्ये डिसेंबर 2019पासून कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळले. त्यानंतर तो वुहान मार्केटबाहेर त्याचा संसर्ग झाला. तसे पुरावेही आढळले आहेत. या विषाणूचा फैलाव वटवाघळापासून झाल्याचे सांगण्यात येते. मात्र त्याबाबतही पुरावे सापडले नाहीत. नेमक्या कोणत्या प्राण्यामुळे करोना संसर्ग झाला, याविषयीचे ठोस पुरावे नसल्याचेही डब्ल्यूएचओने सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईकरांना वाटते ‘लोकल’च बेस्ट!

मुंबईकरांनो खा, प्या अन् मजा करा…65 ठिकाणी उभारणार स्ट्रीट हब