in

कोरोनाच्या स्ट्रेनचं WHOकडून नामकरण; भारतातील स्ट्रेन ‘डेल्टा’ आणि ‘कप्पा’

जगभरात कोरोनाचे वेगवेगळे स्ट्रेन निर्माण झाले आहे. कोरोनाच्या विषाणूमध्ये बदल झाल्याने हे स्ट्रेन निर्माण झाले असून त्याच्या नावांवरून गोंधळ निर्माण झाला असून, वादही होताना दिसत आहे. या सगळ्या गोंधळावर जागतिक आरोग्य संघटनेनं मार्ग काढला असून विविध देशात आढळून आलेल्या कोरोना स्ट्रेनचं नामकरण केलं आहे. या स्ट्रेनला नाव देताना ग्रीक वर्णमालेचा आधार घेण्यात आला आहे. त्यामुळे भारतात आढळून आलेल्या दोन स्ट्रेन डेल्टा आणि कप्पा अशी नावं देण्यात आली आहेत.

कोरोनाचे नवीन स्ट्रेन निर्माण झाल्यानंतर त्यांच्या नावावरून वाद सुरू झाले होते. काही दिवसांपूर्वीच डबल म्युटेशन असलेल्या B.1.617.2 स्ट्रेनचा भारतीय स्ट्रेन असा उल्लेख काढण्याचे आदेश केंद्र सरकारने सोशल मीडियाला दिले होते. तर सिंगापूर सरकारनंही सिंगापूरमध्ये आढळून आलेलं नवीन म्युटेशन भारतातीलच असल्याचं म्हटलं होतं. या सगळ्या वादावर मार्ग काढत जागतिक आरोग्य संघटनेनं विविध देशात आढळून आलेल्या स्ट्रेनला नावं दिली आहेत.

आतापर्यंत भारतात कोरोनाचे दोन स्ट्रेन आढळून आले आहेत. त्या दोन्ही स्ट्रेनचंही नाव बदलण्यात आलं आहे. ग्रीक वर्णमालेचा वापर करून आरोग्य संघटनेनं ही नाव निश्चित केली आहेत. यात ऑक्टोबर २०२०मध्ये भारतात आढळून आलेल्या B.1.617.2 या स्ट्रेनला डेल्टा असं नाव देण्यात आलं आहे, तर मागच्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदा आढळून आलेल्या B.1.617.1 या स्ट्रेनला ‘कप्पा’ असं नाव देण्यात आलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

OBC Reservation | आरक्षण मिळाले नाही, तर आम्ही निवडणुका होऊ देणार नाही

पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी टीव्ही अभिनेता करण मेहराला अटक