in

सावरकरांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव कोणी रखडवलाय? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा प्रश्न नेहमीच उपस्थित होते. या मुद्द्यावरून अनेकदा राजकारण रंगताना दिसले आहे. याच मुद्द्यावर विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणासंदर्भात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले. तसेच वीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव रखडवलाय तरी कोणी? असा सवाल विरोधकांना केला.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०/८/२०१८ आणि १७/१/२०१९ या दोन तारखांना सावकरांना भारतरत्न देण्यासंदर्भातील शिफारस पत्र सरकारकडून पाठवण्यात आली असल्याचीही आठवण त्यांनी करून दिली. कोण देतं भारतरत्न? आमदरांची कमिटी आहे का? राज्यातील आमदारांची कमिटी आहे का ठरवायला की भारतरत्न कोणाला त्यायचं? भारतरत्न देण्याचा अधिकार देशाच्या पंतप्रधानांना आणि केंद्रीय समितीला आहे. का दिलं जात नाही हो सावरकरांना भारतरत्न?,” असा प्रश्न त्यांनी विरोधी पक्ष नेत्यांना विचारला.

“सर्वच तुम्हाला पाहिजेत. वल्लभभाई आमचे, सावरकर आमचे. गांधीजी आमचे. हे आमचे… ते आमचे. तुम्ही निर्माण काहीच केलं नाही. तुम्ही कोणते आदर्श निर्माण केले नाहीत. पण जे तयार आदर्श आहेत ते घ्यायचे आणि त्याच्यावर आपला शिक्का मारायचा,” असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपाला लगावला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Tech Update : Samsung Galaxy A32 लाँच , पाहा फीचर्स आणि किंमत

Gold Silver Rate: सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण