in

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन करणार ‘तो’ अज्ञात व्यक्ती कोण ?

मंत्रालयातील कंट्रोल रूमकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक निनावी फोन आला होता. त्या फोनवर मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचं सांगण्यात आलं. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली आणि त्यानंतर पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आलं आहे.

एका अज्ञात व्यक्तीकडून फोनद्वारे मंत्रालय उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या अज्ञात व्यक्तीच्या धमकीची दखल घेत मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मंत्रालयात बॉम्बशोधक पथक, श्वान पथक दाखल झाले असून बॉम्बचा शोध सुरु करण्यात आला . फोनद्वारे दिलेल्या धमकीमध्ये मंत्रालय बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी मंत्रालयाच्या कंट्रोल रुमला मिळाली होती. मंत्रालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून आता बॉम्ब स्कॉड आणि श्वानपथकामार्फत तपासणी सुरु करण्यात आली .

या संदर्भात फोन केलेल्या अज्ञात व्यक्ती बद्दल माहिती समोर आली आहे. हा व्यक्ती नागपुर असून त्याचे नाव सागर काशिनाथ मंदरे आहे. १२ फेब्रुवारी रोजी या व्यक्तीने आत्मदहानाचा इशारा दिला होता आणि मुख्य सचिवांना अटक करण्याची मागणी केली होती. अधिक तपासामध्ये हा तरुण मानसिकरित्या स्वस्थ नसल्याचे समजते आहे. तसेच मंत्रालयातील परिसरात काहीही अक्षेपार्ह असे आढळले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोना नियमांचे तीनतेरा, बैलगाडी शर्यती सुरूच

कंगना रणौतच्या बॉडीगार्डला लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक